कर्तव्याला जपत गुन्हेगारी रोखणार्‍या शिलेदारांचा भुसावळात सन्मान


Bhusawal honors Shiledars who prevent crime while keeping their duty भुसावळ : दैनंदिन कामकाज वेळेत पूर्ण करण्यासह गुन्ह्यांची निर्गती, अद्यावत फायलिंग, मोटार व्हेईकलच्या केसेस करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या खाकीतील शिलेदारांचा भुसावळात सन्मान करण्यात आला. भुसावळातील डीवायएसपी कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये शनिवारी क्राईम मिटींगनंतर भुसावळातील तीन्ही पोलीस ठाण्यासह नशिराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत ‘एम्प्लॉई ऑफ द मंथ‘ संकल्पनेतील कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला.

पुरस्काराने मिळेल अधिक काम करण्याचे बळ
पोलीस ठाण्यात उत्कृष्ट काम करणार्‍या पोलीस अंमलदार यांचे कौतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यात सांघिक भावना निर्माण व्हावी व दैनंदिन कामकाजामध्ये उत्कृष्ट काम करण्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी पोलीस स्टेशन एम्प्लॉई ऑफ द मंथ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.



यांची होती उपस्थिती
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, निरीक्षक संदीप रणदिवे, निरीक्षक गजानन पडघन, निरीक्षक बबन जगताप आदींची प्रसंगी उपस्थिती होती. दुचाकी चोरी प्रकरणाचा तपास उघड करीत 12 दुचाकी जप्त करणार्‍या बाजारपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर, महेश चौधरी, यासीन पिंजारी, दिनेश कापडणे, सचिन चौधरी, जावेद शहा, राहुल वानखेडे, भूषण चौधरी यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी नशिराबाद येथील पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या कर्मचार्‍यांचा झाला गौरव
गुन्हे उघडकीस आणण्यास मदत करणार्‍या तसेच भादंवि 279 व 337 चा गुन्हा खोटा असल्याचे सिद्ध करणार्‍या भुसावळ शहर पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार मोहम्मद अली सत्तार अली सैय्यद, दुचाकी चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आणणार्‍या बाजारपेठ पोलिसात ठाण्यातील महेश एकनाथ चौधरी तसेच क्राईम अभिलेख अद्यावत ठेवणार्‍या भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील जगदीश चावदस भोई, अर्ज निर्गती करणार्‍या नशिराबाद पोलीस ठाण्यातील तुषार विजय पाटील, मोटार व्हेईकलच्या 319 केसेस करणार्‍या भुसावळ शहर वाहतूक शाखेतील प्रवीण आनंदा पाटील यांचा गौरव करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !