डॉ.संदीप पाटील लिखीत सरोगसी या पुस्तकाचे प्रकाशन
Publication of the book Surrogacy written by Dr. Sandeep Patil रावेर : खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचे स्नेहसंमेलन व डॉ.संदीप पाटील ‘लिखित सरोगशी’ या पुस्तकाचे पुस्तक प्रकाशन सोहळा झाला. माऊली फार्म हाऊसवर माऊली हॉस्पीटलचे डॉ.संदीप पाटील लिखीत सरोगशी या पुस्तकाचे डॉ.माजी खासदार उल्हास पाटील यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.
सरोगसी या पुस्तकाच्या लीगल राइट्स व लॉ संदर्भात डॉ.संदीप पाटील यांनी माहिती दिली. डॉ.उल्हास पाटील यांनी डॉ.योगीता पाटील व डॉ.संदीप पाटील यांचे कौतुक करून पुस्तकाचे उपयोगिता या संदर्भात सर्व डॉक्टरांना माहिती दिली. हे पुस्तक सेवासदन कॉलेज बर्हाणपूरचे प्राचार्य अॅड.मोहन सोनी व इंदोर येथील हायकोर्टाचे वकील रघुनंदन सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने डॉ.संदीप पाटील यांनी लिहिले. या स्नेहसंमेलनामध्ये 30 ते 90 वर्ष वयातील सर्व डॉक्टर मंडळींनी हिरीरीने स्नेहसंमेलनात भाग घेतला. डॉ.राजेंद्र आठवले (रावेर), डॉ. श्रीराम पाटील (ऐनपूर), डॉ हिरालाल पाटील (निंबोल), डॉ.अमोल पाटील, चिमुकली सानवी व जयदीप यांनी विविध गीत व सांस्कृतीक कार्यक्रम, भगवद्गीतेचा श्लोक सादर केले. डॉ.रवींद्र वानखेडे, डॉ.नीलकंठ पाटील (पुनखेडे), डॉ.प्रतीक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.वहिद, डॉ.सुधाकर चौधरी, डॉ.एम.बी.वाणी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन भूषण चौधरी व फाल्गुनी सोनी (बर्हाणपूर) यांनी तर आभार डॉ.योगीता पाटील यांनी मानले.







