स्नेहयात्री करंडक एकांकिका स्पर्धेत स्वामी नाट्यांगण, मुंबईची ‘फक्त दोन मिनिट’ प्रथम
अंधेरीच्या क्रिएटीव्ह कार्टी संस्थेची ‘एन्ट्रोगेशन’ ला द्वितीय पारीतोषिक
Swami Natyangan, Mumbai’s ‘Fakt two minutes’ first in Snehayatri Karandak One Act Competition भुसावळ : स्नेहयात्री प्रतिष्ठानतर्फे येथील श्रीकृष्णचंद्र सभागृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. शनिवार व रविवार असे दोन दिवस झालेल्या या स्पर्धेचा निकाल रात्री उशीरा जाहीर झाला. त्यात स्वामी नाट्यांगण, मुंबई या संस्थेची ‘फक्त दोन मिनिट’ ही एकांकिका प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरली. स्पर्धेत व्दितीय क्रमांक क्रिएटीव्ह कार्टी, अंधेरीच्या ‘एन्ट्रोगेशन’ या एकांकिकेने तर तृतीय पारितोषिक सोलापूरच्या ‘मै हूं ना’ आणि मुंबईच्या ‘दीन तैसी रजनी’ या एकांकिकेने पटकावले. स्कूल ऑफ हार्ट्स, नाशिकच्या ‘इनर लगेज’ या एकांकिकेला उत्तेजनार्थ पारितोषिक देवून गौरविण्यात आलं.
विजेत्या संघांचा गौरव
स्व.लालचंद लखीचंद निमाणी यांच्या स्मरणार्थ जय निमाणी यांच्याहस्ते प्रथम क्रमांकाचे 11 हजारांचे रोख पारितोषिक, आय सोलर पॉवरचे संचालक यांच्याकडून रुपये सात हजारांचे व्दितीय तर प्रदीप चौधरी यांच्यातर्फे चार हजारांचे तृतीय व दिलदार ग्रुप यांच्याकडून उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी आतिषबाजी करत प्रत्येक विजेत्या संघांचा मोठ्या जल्लोषात गौरव करण्यात आला.



या मान्यवरांची उपस्थिती
समारोप सत्रात युवराज लोणारी, चंद्रशेखरजी अग्रवाल, प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, जय निमाणी, गुणवंत बोरोले, संदीप सुरवाडे या मान्यवरांची या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.जयेंद्र लेकुरवाळे तर सूत्रसंचलन प्रा.गिरीष कुलकर्णी यांनी केले.
स्नेहरंग या रंगारंग कार्यक्रमाचे दमदार सादरीकरण
नृत्य प्रशिक्षक मयुर तायडे, निन्जा कोडर्स हबच्या विद्यार्थीनी, चाटे क्लासेस, वरणगावच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार नृत्य सादर केले. हर्षवर्धन बाविस्कर, दीपाली बावीस्कर यांनी बहारदार गाणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी रितेश वानखडे आणि मानसी पाटील यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचा निकाल असा
सांघिक प्रथम- फक्त दोन मिनिट (स्वामी नाट्यांगण, मुंबई), सांघिक व्दितीय : एन्ट्रोगेशन (क्रिएटीव्ह कार्टी, अंधेरी), सांघिक तृतीय : मै हूं ना (वैभवदिप नाट्यसंस्था, सोलापूर) आणि दीन तैसी रजनी (नाट्यगंधर्व, मुंबई) असे विभागून देण्यात आले. सांघिक उत्तेजनार्थ- इनर लगेज (स्कूल ऑफ हार्टस्, नाशिक), दिग्दर्शन- प्रथम क्रमांक – यश नवले/चैतन्य परदेशी (फक्त दोन मिनिट), व्दितीय क्रमांक- योगेश कदम (एन्ट्रोगेशन), तृतीय क्रमांक- मोहिनी जोशी/मयुरेश पंडीत (विभागून), अभिनय- प्रथम क्रमांक – अमेयच्या भूमिकेत यश नवले ( फक्त दोन मिनिट), व्दितीय क्रमांक- निरंजनच्या भूमिकेत गौरव पाटील (संपर्क क्रमांक), तृतीय क्रमांक- म्हाताराच्या भूमिकेत योगेश कदम (एन्ट्रोगेशन), उत्तेजनार्थ- ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस दामले (दीन तैसी रजनी), स्त्री अभिनय- प्रथम क्रमांक – इराच्या भूमिकेत साक्षी पाटील ( फक्त दोन मिनिट), व्दितीय क्रमांक- ती च्या भूमिकेत मोहिनी जोशी (मै हूं ना), तृतीय क्रमांक- मुलगीच्या भूमिकेत राजश्री जमदाडे (एन्ट्रोगेशन), उत्तेजनार्थ – सारीकाच्या भूमिकेत यशश्री कंटक (संपर्क क्रमांक), नेपथ्य : ऋतिक अमळकर (प्रथम), गौरव पुजारी (व्दितीय), वेदांत पावसकर (तृतीय), प्रकाशयोजना : राजेश शिंदे (प्रथम), कृतार्थ कंसारा (व्दितीय), विक्रम गवांदे (तृतीय).
यांचे लाभले स्पर्धेसाठी सहकार्य
परीक्षक म्हणून डॉ.चंद्रकांत शिंदे (अमरावती), डॉ.गणेश शिंदे (उस्मानाबाद) आणि संदिप पाचंगे (नाशिक) यांनी काम पाहिले.. पारितोषिकांसाठी रवींद्र निमाणी, आयसोलर पॉवर, संदीप चौधरी, गिरीष कुलकर्णी, जयेंद्र लेकुरवाळे, राजेंद्र जावळे, चैत्राली विसपुते, हरीश कोळी, राजेश पाटील, मानसी पाटील, आदर्श पंडा, अजय पाटील यांचे सहकार्य लाभले.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वीतेसाठी रामचंद्र डहाके, नारायण माळी, प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी, धनराज कुवर, राजेश पाटील, हरीश कोळी, आदर्श पंडा, तुषार जोशी, मानसी पाटील, समृध्दी पाटील, नितीश पाटील, नवरत्न डहाके, सनी बाविस्कर, शर्मिला पाटील, हर्ष बाविस्कर, भाग्यश्री बाविस्कर, भारती वैष्णव, अजय पाटील, संजीवनी यावलकर, रितेश वानखडे, खुशाल निंबाळे, मयुरेश कुळकर्णी आदींनी परिश्रम घेतले.




