बंजारा लोकगीतांवर ठेका धरत बंजारा समाज बांधवांसोबत अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलिवंदन


Ad. Rohini Khadse celebrated Dhulivandan with Banjara community members by singing Banjara folk songs. मुक्ताईनगर : आनंदासोबतच सप्तरंगांची उधळण करणारा होळी सण राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी बंजारा समाजबांधवांसोबत साजरा केला. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे हे गेल्या 30 वर्षांपासून नियमित होळीला या गावांमध्ये जाऊन बंजारा समाज बांधवांच्या आनंदात सहभागी होत असल्याने त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे सुद्धा गेल्या चार वर्षांपासून आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यां समवेत धुलीवंदनाच्या दिवशी या गावांमध्ये जाऊन बंजारा समाज बांधवांसोबत धुलीवंदन साजरे करीत आहते.

बंजारा समाजबांधवांचा आनंद द्विगुणीत
यंदादेखील रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील बंजारा वस्ती असलेल्या टाकळी, मोरझिरा, धामणगाव, नवीन बोरखेडा, जुने बोरखेडा, जोंधनखेडा, उमरा या गावांमध्ये जाऊन बंजारा समाज बांधवांसोबत धुलीवंदन साजरे केले. यावेळी रोहिणी खडसे यांनी बंजारा समाज भगिनी सोबत डफाच्या तालावर पारंपारिक बंजारा लोकगीतांच्या चालीवर नृत्यात सहभागी होऊन बंजारा समाज भगिनींचा आनंद द्विगुणित केला व त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.




यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी सभापती दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, कुर्‍हा सरपंच डॉ.बी.सी.महाजन, बाजार समिती संचालक प्रवीण कांडेलकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल रोटे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष मुन्ना बोंडे, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शिवा पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना कांडेलकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल तालुकाध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, जि.प.चे माजी सदस्य निलेश पाटिल, प्रदीप साळुंखे, बाळा भालशंकर, बबलू सापधरे, प्राजक्ता चौधरी, भैय्या पाटील, मयुर साठे, योगेश काळे, वसंता पाटील, विनोद काटे, सुरेश तायडे, बाळा सोनवणे, महेश भोळे, संदीप पाटील, रसाल चव्हाण, कांतीलाल चव्हाण, बाळू जाधव, राजू चव्हाण, जितेंद्र चव्हाण, हरलाल राठोड, छगनलाल राठोड, इंदल राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !