गिरणा पात्रातून वाळू चोरी : धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे


Theft of sand from mill vessel: Different crimes against two in Dharangaon police धरणगाव : गिरणा नदी पत्रातून वाळू चोरी करणार्‍या दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव शिवारातील सिध्दीविनाय क प्लॉट भागातील गिरणा नदीपात्रातून विकास भिका वाघ (39, रा.बांभोरी प्र.चा., ता.धरणगाव) या तरुणाला निळ्या रंगाच्या विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीतून तीन ब्रास वाळू चोरी करून नेतांना पोलिसांनी पकडले. याप्रकरणी कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गजानन महाजन हे करीत आहेत.



दुसर्‍या घटनेत बांभोरी प्र.चा., ता.धरणगाव शिवारातील वैजनाथ ते बांभोरी प्र.चा. रोडवर के.बी.एक्स. कंपनीजवळ मयूर दिनकर पाटील (25, रा.साकेगाव, ता.भुसावळ) याला पोलिसांनी अशोक लेलॅण्ड कंपनीचे पिवळ्या रंगाचे डंपर (एम.एच.19 सी.वाय.0010) यातून सहा हजार रुपये किंमतीची दोन ब्रास वाळू चोरून नेतांना पकडले. याप्रकरणी कॉन्स्टेबल सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गजानन महाजन करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !