माझा नेताच पलटूराम निघाला : विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिलेेले खरमरीत पत्र व्हायरल


Maja Netach Palturam Chhala : Haramari letter written by activists to Vijay Shivtare goes viral बारामती : बारामतीत अजित पवारांना विंचवाची उपमा देणारे विजय बापू शिवतारे यांचे बंड क्षमले असलेतरी त्यानंतर आता मात्र नवीन वाद समोर आला आहे. विजय शिवतारे यांना कार्यकर्त्यांने पत्र लिहित काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पुरंदरचा तह झाला अन् माझा नेताच आता पलटूराम निघाला, आम्ही तरी काय करावं, पवार विरोधी पाच लाख मतदारांनी आता काय भूमिका घ्यावी, असा खरमरीत सवाल पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

कार्यकर्ते म्हणाले पुरंदरचा तह झाला
शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांना खरमरीत पत्र लिहित त्या पाच लाख पवार विरोधी मतदारांनी काय करायचं? असा सवाल केला आहे. ‘माझा नेता पलटूराम निघाला’, असं कार्यकर्त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. कार्यकर्त्यांनी ‘पुरंदरचा तह म्हणत.. विजय शिवतारे यांना हे खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रात विजय शिवतारे यांच्यावर कार्यकर्त्याकडून जोरदार टीका केली आहे. आपल्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांची नेमकी काय अडचण होते, हे या पत्रात मांडले गेले आहे.


समर्थकांच्या पत्रात नेमकं काय म्हटलं?
”बापू, 13 मार्च 2024 रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेवून बारामती लोकसभेची निवडणूक ‘अपक्ष’ लढवण्याचा निर्धार केला. त्यानंतर मीडीयाने तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं. दर अर्ध्या तासाच्या बुलेटीनला ‘तुमची’ स्फोटक विधाने गाजू लागली. चॅनेल कुठलंही लावा दिसणार फक्त ‘शिवतारे बापू’ हे ठरलेलं. त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीने ‘एल्गार’ पुकारला. अजित पवारांची गुर्मी तशीच आहे. ते उर्मट आहेत. पण, अजित पवारांना तो पश्चात्तापही नाही. जणू काही लोकांना फसवणे हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्यासारखे ते वागत आहेत. मात्र आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झाला आहे? आता तुम्ही रामायणातले बिभिषण आहात की नाही? हेही आम्हाला कळू द्या. बापू, पवारांच्या विरोधातल्या 5 लाख 80 हजार मतदारांनी आता नेमकं काय करायचं?, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे.

माझा नेता ‘महाराष्ट्राचा पलटूराम’
बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे. तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुध्दा. तुम्ही म्हणाल तसं आजपर्यंत करीत आलो आहे. 2019 ला सुध्दा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलो आहे. कारण, तुम्ही माझे नेते आहात. पण, काल माझा नेता असा संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला, याचं फार वाईट वाटलं. बापू, ज्या मीडीयाने तुम्हाला डोक्यावर घेतलं, त्याच मीडीयाने तुमची लया फार घालवून टाकली. सोशल मीडीयात तर तुम्हाला ‘महाराष्ट्राचा पलटूराम’ म्हणून ‘हॅशटॅग’ फिरवला जात आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !