चाळीसगावला प्रांताधिकार्‍यांची सायकलफेरीने मतदान जनजागृती

हौशी सायकलिस्टचे आयोजन : ओझर, खडकी बु. येथे ग्रामस्थांना दिली माहिती


Voting awareness by cycle tour of provincial officials to Chalisgaon चाळीसगाव : 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी. यासोबतच प्रत्येक नागरिकाने मतदान करावे यासाठी 31 रोजी प्रांताधिकारी प्रमोद हिले येथील हौशी सायकलिस्ट बरोबर मतदान जनजागृती मोहिमेत सहभागी झाले होते.

मतदारांच्या शंकांचे निरसन
रविवारी सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायकलफेरीला सुरुवात झाली. नांदगाव रस्त्यावरील खडकी बु. व भडगाव रोडवरील ओझर येथे जमलेल्या ग्रामस्थांना प्रांताधिकारी हिले यांनी मतदान करण्याबाबत आवाहन केले तर मतदारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन निवासी नायब तहसिलदार जितेंद्र धनराळे केले.

यावेळी मतदान केंद्रांवर उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंडप, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाळणाघर, दिव्यांग व्यक्तिंसाठी रॅम्प अशा सुविधा करण्यात येत आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते प्रत्येकाने बजावलेच पाहिजे. गेल्या निवडणुकीत केवळ 58 टक्के मतदान झाले होते. लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्य आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलेच पाहिजे. असे आवाहनही प्रांताधिका-यांनी केले. स्वतः प्रांताधिकारी सायकलवर येऊन मतदानाची माहिती देत आहे. याबद्दल ग्रामस्थांनी कुतूहल व्यक्त केले. यशस्वितेसाठी तहसिलदार प्रशांत पाटील, निवणुक नायब तहसिलदार संदेश निकुंभ, सायकलगृपचे अध्यक्ष दिपक देशमुख, धनंजय मांडोळे, मनिष शेलार यांनी सहकार्य केले. एकुण 20 किमीची सायकलफेरी पार पडली.

या हौशी सायकलिस्टने घेतला सहभाग
मतदान जनजागृती सायकलफेरीत प्रांताधिकारी प्रमोद हिले, निवासी नायब तहसिलदार जितेंद्र धनराळे यांच्यासोबत हौशी सायकलिस्ट रवींद्र पाटील, जिजाबराव वाघ, टोनी पंजाबी, अ‍ॅड.भूषण एडके, सुरेश मंधानी, सोपान चौधरी, योगेश पवार, राजेंद्र वाणी, सोनू महाजन, शांताराम पाटील, हर्षल पाटील, सुजित राजपूत आदी सहभागी झाले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !