17 लाखांचे दागिणे लांबवणार्‍या जळगावातील बंगाली कारागीराला गोंदियातून अटक

रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी : जळगाव शनीपेठ पोलिसांनी घेतला आरोपीचा ताबा


Performance of Railway Security Force : Jalgaon Shanipeth Police took custody of the accused जळगाव : सराफा बांधवांकडून दागिणे घडवण्यासाठी आणलेले तब्बल 256 ग्रॅम वजनाची व बाजारमूल्यानुसार 17 लाख रुपये किंमतीचे सोने घेवून जळगावातून बंगाली कारागीर पसार झाला होता. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात शेख अमीरूल हुसेन (28, मंडूलीका बाजार, आयरीपुता, ता.जगत वल्लभपूर, जि.हुगली, राज्य पंश्चिम बंगाल, ह.मु.जोशी पेठ, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केल्यानंतर ारोपी गावाकडे 012809 सीएसटी-हावडाने जात असताना गोंदिया स्थानकावर त्याला रेल्वे सुरक्षा बलाने बेड्या ठोकल्या. दरम्यान, आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यास शनीपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण
जळगावातील सराफा व्यापारी शुभम प्रदीप वर्मा (30, लक्ष्मी नगर, जळगाव) आणि खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (जळगाव) यांनी ंगाली कारागीर यांच्याकडे सोन्याचे बिस्किट व तुकडे देऊन दागिने घडवण्याचे काम दिले होते. त्यांनी बुधवार, 27 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन (28, मंडूलीका बाजार, आयरीपुता, ता.जगत वल्लभपूर, जि.हुगली, राज्य पंश्चिम बंगाल, ह.मु.जोशी पेठ, जळगाव) याला 15 लाख रुपये किंमतीची 254 ग्रॅम सोन्याची लगड आणि दोन लाख रुपये किंमतीचे 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट असे एकूण 17 लाखांचे सोने दागिणे बनविण्यासाठी दिले. बंगाली कारागीर अमीरूल हुसेन याने दिलेल्या सोन्याच्या लगड व बिस्कीट याचे दागिने न बनवता 17 लाखांचे सोने घेऊन पसार झाला. हा प्रकार गुरुवार, 28 रोजी उघडकीस आला. सोन्याचे व्यापारी शुभम वर्मा आणि खेतेंद्र शर्मा यांनी शनीपेठ पोलिसात धाव घेत बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.



गोंदिया स्थानकावर आरोपी कारागीराला बेड्या
आरोपी तथा बंगाली कारागीर शेख अमीरूल हुसेन (28, मंडूलीका बाजार, आयरीपुता, ता.जगत वल्लभपूर, जि.हुगली, राज्य पंश्चिम बंगाल, ह.मु.जोशी पेठ, जळगाव) हा डाऊन 012809 सीएसटी-हावडाने गावाकडे पसार झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाला सूचित करण्यात आले. सीआयबी निरीक्षक एन.पी.सिंग यांनी गोंदिया रेल्वे सुरक्षा बलाला संपर्क केल्यानंतर आरोपीला गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली.

कर्जातून बाहेर पडण्यासाठी लढवली शक्कल
आरोपी शेख याची शनिपेठ पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितले की, सराफ व्यावसायिकांनी सोने दिल्यानंतर त्याचे दागिने घडवून परत देत असताना त्यात थोडी-थोडी घट येत होती. मात्र सराफ व्यावसायिकांना पूर्ण सोने द्यावे लागते, त्यामुळे दुसर्‍या सराफ व्यावसायिकाकडून दागिने घडवण्यासाठी घेतलेले सोने पहिल्या व्यावसायिकाला देत होता. दुसर्‍या सराफ व्यावसायिकाची भर काढण्यासाठी तिसर्‍याचे सोने त्याला द्यावे लागत असे. असे करता-करता कर्जाचे ओझे वाढत गेले. त्यामुळे आता ज्यांना-ज्यांना सोने द्यायचे आहे, त्यांना ते देण्यासाठी हाती आलेल्या 256 ग्रॅम सोन्यातून हिशोब चुकता करण्याचे शेख याने ठरवले. त्यानुसार त्याने 158.12 ग्रॅम सोने वेगवेगळ्या जणांना देऊन उर्वरित 97.880 ग्रॅम सोने घेऊन तो गावाकडे निघाला होता. गावी जाऊन उर्वरित सोने विकून संबंधित सराफाला पैसे पाठवू आणि उर्वरित रकमेसाठी वेळ मागून घेऊन, असे त्याने ठरवले. मात्र त्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !