यावल आगारात दोन आरामदायी बस दाखल


यावल-पुणे प्रवास होणार आणखी सुखर : लाभ घेण्याचे आवाहन

यावल : यावल एस.टी.आगारात प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाकडून दोन नव्या आरामदायी सुसज्य अशा सिटींग स्लीपर बसेस आगारात दाखल झाल्या आहेत. या बसेस प्रवाशांच्या मागणीनुसार रातराणी प्रवासासाठी यावल ते पुणे चालवल्या जात आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार या बसच्या वेळेत बदल देखील करता येईल असे प्रभारी आगार व्यवस्थापक एस.व्ही.भालेराव यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

राज्यभरातील आगारात बसेस दाखल
संपुर्ण महाराष्ट्रातील राज्यातील एस.टी.परीवहन महामंडळाच्या वतीने 247 एसटीच्या आगारांना त्यांच्या मागणीनुसार या नव्या अत्याधुनिक आरामदायी सीटिंग स्लीपर पुरवण्यात आल्या आहेत. यावलच्या आगारात परिवहन महामंडळाच्या वतीने पाठवण्यात दोन बसेस दाखल झाल्या आहेत. या दोन्ही बसेस सध्या मागणीनुसार यावल ते पुणे सोडण्यात येत आहेत. यावल बसस्थानकावरून दुपारी साडेचार वाजता सोडल्या जात आहेत. या आरामदायी बसची भाडे आकारणी साध्या बसच्या भाडेप्रमाणे घेण्यात येत असून तालुक्यातील प्रवासांनी या साध्या भाड्यात सीटिंग स्लीपर बसचा प्रवास करावा, असे आवाहन यावल प्रभारी आगार व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव, सहाय्यक वाहतूक अधीक्षक जी.पी.जंजाळ,वाहतूक निरीक्षक संदीप अडकमोल व सहाय्यक वाहतूक निरीक्षक कमलाकर चौधरी यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !