जळगाव लोकसभेसाठी उबाटा गटाकडून करण पवार प्रबळ दावेदार !


Karan Pawar strong contender for Jalgaon Lok Sabha from Ubata group! जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने उमेदवार जाहीर केले असलेतरी महाविकास आघाडी व उबाटा गटाकडून दोन्ही जागांवर अद्यापही उमेदवारांची निश्चिती झाली नसल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. जळगाव लोकसभेसाठी विविध पदाधिकार्‍यांची नावे चर्चेत आल्यानंतर पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांचेही नाव आता चर्चेत आले आहे. असे असलेतरी दोन दिवसात जळगाव लोकसभेचा उमेदवार निश्चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उबाटा गटाकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत
पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी ठाकरे गटाच्या पाठिंब्याने लोकसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली होती परंतु विधानसभेच्या दृष्टीनेही मशाल चिन्ह घराघरामध्ये पोहोचवणे गरजेचे असल्याने ठाकरे गटाने पवारांचा हा प्रस्ताव नाकारला होता परंतु आता करण पवार यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याचे व त्यांनी ती मान्य केल्याचे संकेत आहेत.


अंतर्गत नाराजी उबाटा गटाच्या पथ्थ्यावर
विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्यानंतर भाजपने मागील वेळी तिकीट मिळून ऐनवेळी उमेदवारी रद्द केलेल्या स्मिता वाघ यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली त्यामुळे खासदार पाटील यांचा गट कमालीचा नाराज झाला. याच नाराजीचा फायदा ठाकरे गटाने घेण्याचे ठरवले असून पडद्याआड घडामोडी सुरू केल्या आहेत. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार सुरवातीला थेट उन्मेष पाटील यांच्यासोबत संपर्क करण्यात आल्यानंतर त्यांनी उमेदवारीस नकार दिल्यानंतर पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांचे नाव समोर आले आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !