भाजपामध्ये निष्ठावंतांची कदर नाही : खासदार संजय राऊत


BJP does not value loyalists : MP Sanjay Raut मुंबई : उन्मेष पाटील हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते, पण तिथे निष्ठावंताची कदर नाही, म्हणून त्यांनी निष्ठावंत्यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात आता शिवसेनेला ताकद मिळणार असून निवडणूक नुसतीच रंगतदार होणार नाही तर शिवसेनेचा अस्सल भगवा आता फडकणार आहे. खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रवेश सोहळ्यानंतर खासदार राऊत यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले.

उत्तर महाराष्ट्राला मिळाली ताकद ः खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत म्हणाले की, खासदार उन्मेष पाटील व करण पवार यांच्यासोबत सगळे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. उन्मेष पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आता उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढली आहे.


जळगाव लोकसभेसाठी करन पवारांना उमेदवारर
जळगाव लोकसभेसाठी उबाटा गटाचे उमेदवार म्हणून पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्रीवर घोषणा केली.

खासदार उन्मेष पाटील यांच्या हाती शिवबंधन
उन्मेष पाटील यांच्यासह पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार व विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुंबईत बुधवारी दुपारी हातावर शिवबंधन बांधत उबाटा गटात प्रवेश केला. खासदार उन्मेष पाटील भाजपाने उमेदवारी कापल्याने अत्यंत नाराज असल्याने त्यांनी बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल होत हाती मशाल घेतली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !