भुसावळ-मुंबई सेंट्रल विशेष गाडीला मुदतवाढ
भुसावळ : उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेकडून भुसावळ ते मुंबई सेंट्रल विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
गाडी 09051 मुंबई सेंट्रल ते भुसावळ त्री साप्ताहिक विशेष अधिसूचित गाडी 30 एप्रिलपर्यंत धावणार होती ती आता 30 जूनपर्यंत चालविण्यात येणार आहे तसेच गाडी 09052 भुसावळ ते मुंबई सेंट्रल त्री साप्ताहिक विशेष अधिसूचित गाडी 1 मे पर्यंत होती ती आता 1 जुलैपर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे केले आहे.


