राष्ट्रवादीची दुसरी यादी आली समोर : रावेरबाबत मोठा सस्पेन्स कायम !
The second list of NCP came out : There is a lot of suspense about Raver! मुंबई : शरदचंद्र पवार गटाची बहुप्रतिक्षीत दुसरी यादी जाहीर करण्यात आली असलीतरी रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत मात्र अद्यापही मोठा सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. रावेर मतदारसंघात गेल्या तीन दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून आणखी काही घडामोडी पडद्याआड सुरू असल्याने या सर्व राजकीय नाट्यानंतर शुक्रवारी वा शनिवारी उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील रेसमध्ये आहेत.
बीडमध्ये बजरंग सोनवणेंची पंकजा मुंडेंसोबत लढत
बीडमधून पंकजा मुंडे यांच्याविरोधात पुन्हा एकदा बजरंग बप्पा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली तर भिवंडीवर काँग्रेसने अखेरपर्यंत दावा करूनही ही जागा मिळविण्यात शरद पवार गटाने बाजी मारली. या जागेवरून बाळ्यामामा म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे फाईट देतील.

पहिल्या यादीत यांना मिळाली संधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पहिल्या पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यात बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्करराव भगरे गुरूजी तर वर्ध्यातून अमर काळे यांना पक्षाने उमेदवारी दिली मात्र गुरूवारी पक्षाने आणखी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली असली तरी सातारा आणि माढा व जळगाव जिल्ह्यातील रावेरबाबत सस्पेन्स ठेवला आहे.




