जळगावातील शिरसोली रस्ता परिसरातून दुचाकी लंपास
जळगाव : शिरसोली रोड लगत असलेल्या दारू दुकानासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने लांबविली. याप्रकरणी गुरुवार, 4 रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दुचाकी चोरींचे सत्र कायम
धनंजय सुभाष परदेशी (42, रा.संत मुक्ताईनगर) येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते नोकरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवार, 2 रोजी सायंकाळी 7 वाजता ते त्यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 ए.डी.7848) ने डिमार्ट परिसरात आले. त्यांनी देशी दारुच्या दुकानासमोर दुचाकी लावली. मित्र भेटल्याने ते बाजुला चहा पिण्यासाठी गेले. त्यानंतर ते आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेतला असता तपास लागला नाही. त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास रेवानंद साळुंखे करीत आहेत.

