जळगावात अनोळखी इसमाचा अपघातात मृत्यू


जळगाव : एमआयडीसीतील सुप्रिम कॉलनी चौकात गुरुवार, 4 रोजी दीड वाजेच्या सुमारास रोड अपघातात अनोळखी इसमाला गंभीर दुखापत होवून मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अत्यवस्थ इसमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषीत केले.

अनोळखीचा मृतदेह शवविच्छेदन कक्षाच्या शवपेटीत ठेवण्यात आला. ओळख पटवून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घ्यावा, असे आवाहन एमआयडीसी पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !