भरधाव वाहनाची दुचाकीला धडक ; कुसूंब्यातील तरुणाचा मृत्यू


जळगाव : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरुन खाली पडलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. बुधवार, 3 रोजीच्या मध्यरात्रीनंतर ही घटना एमआयडीसीतील रेमंड चौकात घडली. प्रणव प्रशांत कुदळे ( वय 22,रा. तुळजाईनगर कुसुंबा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

काकांना सोडण्यासाठी गेल्यानंतर गाठले मृत्यूने
नातेवाईकांच्या माहितीनुसार प्रणव हा शहरात बॅनर लावण्याचे काम करुन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होता.त्याच्या विवाहित बहिणीला सोडण्यासाठी बुधवारी त्याचे काका राहुल कुदळे हे कुसुंबा येथे आले. त्यानंतर राहुल कुदळे यांना सोडण्यासाठी प्रणव हा दुचाकीने रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी कुसुंबा येथून मार्गस्थ झाला. एमआयडीसीत भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत प्रणव हा गंभीररित्या जखमी होवून जागेवर बेशुध्दावस्थेत पडला. प्रत्यक्षदर्शीच्या तसेच पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैदकीय अधिकार्‍यांनी मृत घोषीत केले. ही वार्ता कुटुंबियांना कळताच आक्रोश केला. या घटनेने तुळजाईनगर – कुसुंब्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन केल्यानंतर गुरुवार, 4 रोजी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !