मध्य रेल्वेच्या 9 कर्मचार्‍यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने सन्मान


9 employees of Central Railway honored with General Manager Safety Award भुसावळ : कर्तव्यावर असतांना चांगले कामे केल्याने मध्य रेल्वेतील मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर व पुणे येथील कर्मचार्‍यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर येथील प्रत्येकी दोन कर्मचार्‍यांचा तर भुसावळ येथील एका कर्मचार्‍याचा समावेश आहे. या कर्मचार्‍यांना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी सुरक्षा पुरस्काराने सन्मानित केले.

कर्तव्यावरील सतर्कतेची दखल
कर्तव्यावर असताना त्यांनी दाखवलेली दक्षता, गेल्या काही महिन्यांत रेल्वेच्या कामकाजात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात अनुचित घटना रोखण्यात त्यांनी दिलेले योगदान याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्यासाठी प्रशस्तीपत्र आणि रोख दोन हजार रुपये असे स्वरूप होते.


यात भुसावळ विभागातील नाशिक रोड येथील पॉइंटमन गणेश गाडगे यांनी 22 मार्चला नाशिकरोड स्थानकावरून 11055 डाउन गोदान एक्स्प्रेस निघण्यापूर्वी गाडीच्या सामानाच्या डब्यात आग लागलेली पाहिली. त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांना माहिती देऊन तात्काळ ट्रेन थांबवण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि कामाप्रती समर्पित भावनेमुळे मोठा अपघात टळला. यामुळे त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी अन्य विभागातील आठ कर्मचार्‍यांना सुध्दा सन्मानित करण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !