सोन्याला उच्चांकी भाव : एकाच दिवसात 850 रुपयांची वाढ ; जाणून घ्या नेमकी बातमी


High price of gold : 850 rupees increase in a single day ; Know the exact news जळगाव : गेल्या महिन्यात केवळ सोन्याचे भाव वाढत असताना आता सोन्यासह चांदीच्याही भावात मोठी वाढ सुरू झाली असून दोघांमध्ये भाववाढीची सध्या स्पर्धा सुरू झाली आहे. शनिवार, 6 एप्रिल रोजी सोन्याच्या भावात 850 रुपयांची वाढ होऊन ते 71 हजार 100 रुपये प्रति तोळा झाले तर चांदीत एकाच दिवसात एक हजार 400 रुपयांची वाढ होऊन ती 80 हजार 900 रुपये प्रति किलोवर पोहोचली.

आणखी भाववाढीची शक्यता
दोन दिवसांपूर्वीच गुरुवार, 4 एप्रिल रोजी सोने 70 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर शुक्रवार, 5 एप्रिल रोजी त्यात 250 रुपयांची वाढ झाली व ते 70 हजार 250 रुपये प्रति तोळा झाले. शनिवारी ही वाढ कायम राहत त्यात पुन्हा 850 रुपयांची वाढ झाली व सोन्याने 71 हजारांचाही पल्ला ओलांडून ते 71 हजार 100 रुपये प्रति तोळा झाले.


चांदीचा सर्वाधिक भाव
चांदीच्याही भावात तीन दिवसांत मोठी वाढ झाली. शनिवार, 6 एप्रिल रोजी तर थेट एक हजार 400 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी 80 हजार रुपयांच्या पुढे जात 80 हजार 900 रुपये प्रति किलोवर पोहोचली. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. यापूर्वी अनेक वेळा चांदी 77 व 78 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली मात्र, 4 एप्रिलला 79 हजार व आता 6 एप्रिल रोजी 80 हजार हा चांदीचा मोठा टप्पा आहे.

दरम्यान, 71 हजार 100 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेल्या सोन्याची खरेदी करताना एक तोळा सोन्यासाठी जीएसटीसह 73 हजार 233 रुपये मोजावे लागणार आहेत तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 83 हजार 327 रुपये मोजावे लागणार आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !