भरधाव आयशरच्या धडकेत पाडळसेतील वयोवृद्ध ठार


An elderly man from Padalse was killed in a collision with a speeding Eicher जळगाव : नशिराबाद टोल नाक्याजवळ भरधाव वेगाने येणार्‍या आयशरने जोरदार धडक दिल्याने पाडळसेतील वयोवृद्ध ठार झाले. हा अपघात शनिवार, 6 एप्रिल रोजी सकाळी घडला. अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. रवींद्र प्रभाकर चौधरी (62, रा.पाडळसे, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

आयशरच्या धडकेने मृत्यू
भुसावळ तालुक्यातील पाडळसे येथे रविंद्र चौधरी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. ते जळगव येथील राजू राणे यांच्या एलपीजी पेट्रोल पंपावर कामावर होते. नेहमीप्रमाणे शनिवार, 6 एप्रिल रोजी सकाळी त्यांचे सहकारी विनोद दामू तळेले (47, रा.भुसावळ) यांच्या सोबत दुचाकीने जळगावला कामावर येण्यासाठी निघाले. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास नशिराबाद टोलनाक्याजवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणार्‍या आयशरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले रवींद्र चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांचा मृत्यू झाला तर विनोद तळेले हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान, मृतदेह तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !