घरफोडीच्या गुन्ह्यात वॉण्टेड आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Wanted accused in house burglary in MIDC police net जळगाव : यावल पोलिसांना घरफोडीच्या गुन्ह्यात हवा असलेल्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यास पुढील तपासकामी यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रवी प्रकाश चव्हाण असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना आरोपी रवी चव्हाण याच्याबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी पथकाने कारवाईचे निर्देश दिले. जळगावच्या मेहरुण परिसरातील शेरा चौकातून आरोपीला अटक करण्यात आली.



एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलसी उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल पंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, नितीन ठाकुर, मुकेश पाटील आदींनी ही कारवाई केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !