नवदाम्पत्याने घेतली मतदान करण्याची शपथ
The newlyweds took an oath to vote भुसावळ : लोकसभा सार्वत्रीकनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने मतदारांनी मतदान करावे यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. या अंतर्गत सुनसगाव, ता.भुसावळ येथे नवदाम्पत्याने लग्न मंडपात 13 मे रोजी आपला मतदानाचा हक्क बजावण्याची प्रतिज्ञा घेतली.
वर्हाडींनाही केले मतदानाचे आवाहन
सुनसगाव, ता.भुसावळ येथे दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय, सुनसगाव येथे कार्यरत शिपाई अनिल सपकाळे व कविता अनिल सपकाळे यांचा मुलगा लोकेश व सीमा यांचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भुसावळ तालुका प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, नायब तहसीलदार अंगद आसटकर व स्वीप नोडल अधिकारी किशोर वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली लग्न समारंभात भुसावळ तालुका निवडणूक विभागातर्फे सहाय्यक स्वीप अधिकारी नितिन भालेराव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित पाहुण्यांसमोर नवदाम्पत्याने मतदान घेण्याची शपथ घेतली तसेच उपस्थित पाहुण्यांनाही विनंती केली.


येत्या सोमवार, 13 मे रोजी न चुकता आपला संविधानिक मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय, सुनसगावचे मुख्याध्यापक तथा भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष जे.पी.सपकाळे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले.
