भुसावळात बहारदार नृत्याने सजली पाडवा पहाट

भुसावळातील नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीचा उपक्रम


भुसावळ : शहरात गुढी पाडव्यानिमित्त ‘पाडवा पहाट’ या शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला सगळ्यात लहान कलावंत शांभवी निनावे व नुपूर भालेराव यांच्याहस्ते नटराज पूजन करण्यात आले.

गायत्री मंदिरात सकाळी सुरू झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला प्रज्ञा राय हिने गायत्री मंत्र पठण केले. सुरुवातीला साक्षी कुलकर्णी हिने गणेश वंदना सादर केली. नंतर हे शारदे मां या गीतावर नुपूर भालेराव, भार्गवी उंबरकर, माहीता सुरी, शांभवी निनावे यांनी नृत्य सादर केले. नंतर ओम नमः शिवाय या गाण्यावर नम्रता सराफ यांनी नृत्य सादर केले. नंतर कथक नृत्य त्रीताल मध्ये हेमांगी पंडागरे, लतिका श्रीखंडे, किंजल बार्‍हें यांनी सादर केले. इश गिरीश या गीतावर मोक्षदा तळेले, मानसी टेकवाणी व ‘शिव अनादी हैं’ या गाण्यावर भार्गवी उंबरकर, धनश्री भुरे, शानवी चौधरी, माहिता सुरी, नुपूर भालेराव, नक्षत्रा महाले यांनी नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळवली. राम स्तुतीवर नृत्यशिक्षिका चारू भालेराव यांनी नृत्य सादर केले.


एरी सखी मंगल गाओ जी यावर शांभवी निनावे हिने सादर केले. नंतर राम भजन-मानसी भवते तर पायो जी मैने राम रतन घन पायों या गीतावर नुपूर भालेरावने नृत्य सादर केले. ‘भरी भरी मटकी जल’से या गीतावर किंजल बार्‍हे हिने नृत्य सादर केले. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील तराना लतिका श्रीखंडे हिने सादर केला. यावेळी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक तृप्त झाले. सूत्रसंचालन राजेश्री देशमुख तर आभार नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमीचे रमाकांत भालेराव यांनी मानले. यशस्वीतेसाठी गायत्री परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !