भुसावळातील विवेक नरवाडे यांची चिटणीसपदी नियुक्ती


भुसावळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार सोमवार, 8 एप्रिल 2024 रोजी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते नवनियुक्ती पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. भुसावळातील रहिम कुरेशी यांची जिल्हा सरचिटणीसपदी तर विवेक नरवाडे व प्रवीण सुरवाडे यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्त करण्यात आली. जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, भुसावळचे माजी आमदार नीळकंठ फालक, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा सरचिटणीस जमील शेख, सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !