यावलमध्ये अवैध वाळू साठा : दोन लाख 89 हजार रुपये दंड वसुलीचे आदेश


यावल : डॉ.झाकीर हुसैन उर्दू हायस्कुल व न्यु कॉलेजध्ये प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी परीक्षा केंद्रास दिलेल्या भेटी दरम्यान हायस्कुलच्या परीसरात त्यांना 15 ब्रास वाळु साठा आढळल्यानंतर त्यांनी स्थानिक महसुल प्रशासनास चौकशी करून कारवाईचे आदेश दिल्यानंतर संबंधीत शैक्षणीक संस्थेला दोन लाख 89 हजार रुपयांची दंड वसुलीचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावल शहरातील डॉ.झाकीर हुसैन उर्दू हायस्कुल व न्यु कॉलेजच्या आवारात गेल्या काही दिवसापासुन औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या नव्या ईमारतीचे बांधकाम सुरू असुन 22 फेब्रुवारी रोजी फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर बारावी परीक्षेतील केंद्र तपासणीसाठी डॉ.झाकीर हुसैन उर्दू हायस्कुल व न्यु. कॉलेजमध्ये आले असता त्यांना हायस्कुलच्या आवारात वाळुची साठवण आढळली. त्यांनी संस्था चालकांना चांगलेच धारेवर धरत साठवण केलेल्या वाळुच्या चौकशीचे आदेश तहसीलदारांना दिले होते. तहसीलदारांच्या आदेशाने यावलचे तलाठी शरद सुर्यवंशी यांनी चौकशी केल्याने अखेर तो 15 ब्रास वाळुचा साठा अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्याने संस्थाचालकांना 25 रोजी वाळुच्या बाजार भाव मुल्यापेक्षा पाचपट दंडाची रक्कम दोन लाख 89 हजार रुपये भरण्याचे आदेश देण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. वाळु लिलाव बंदी असतांना शहरातील बांधकामांवर वाळु येते कशी? याचीदेखील चौकशी महसुल प्रशासनाने करण्याची मागणी होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !