माढ्याचा तिढा अद्याप कायम : जाणून घ्या राष्ट्रवादीच्या सात उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Madhya rift still remains: Know the list of seven candidates of NCP in one click मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या गटाने आतापर्यंत सात जागांवर आपले उमेदवार जाहीर केले असलेतरी माढ्यातील तिढा मात्र अद्याप सोडवता आला नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीने मंगळवारीच पत्रकार परिषदेत जागा वाटपाचं सूत्र जाहीर केलं. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या दहा जागा लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
जाणून घ्या राष्ट्रवादीचे सात उमेदवार
बारामती- सुप्रिया सुळे
शिरूर- अमोल कोल्हे
अहमदनगर- निलेश लंके
दिंडोरी- भास्करराव भगरे
वर्धा- अमर काळे
बीड- बजरंग बाप्पा सोनावणे
भिवंडी- सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे
सातारा- शशिकांत शिंदे

सातार्यात शिंदेना उमेदवारी
सातारा लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे शिंदेंचं मोठं प्रस्थ आहे. 2009 ते 2014 या काळात कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे आमदारपदी निवडून आले होते. आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपद सोपवण्यात आले होते. भाजपने सातार्यातून उमेदवार जाहीर केला नसला, तरी उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यामुळे शिंदेंचा सामना त्यांच्याशी होण्याची शक्यता आहे.




