जळगाव हादरले : चोरीच्या संशयातून तरुणाचे अपहरण नंतर तरुणाचा मृतदेहच सापडला


Jalgaon shook: The body of the youth was found after the kidnapping of the youth on suspicion of theft जळगाव : चोरी केल्याच्या संशयातून कांचन नगरातील 35 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्यानंतर तरुणाचा मृत्यू ओढवला होता. भेदरलेल्या आरोपींनी तरुणाचा मृतदेह आसोदा शिवारातील पाटाजवळ टाकून पळ काढला होता. तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर यंत्रणेने धाव घेतल्यानंतर तरुणाची ओळख पटवल्यानंतर मयत तरुण ज्ञानेश्वर उर्फ उत्तम पंढरीनाथ बाविस्कर (37, हरीओम नगर, आसोदा, रोड, जळगाव) असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी पाच संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

खुनाने जळगावात खळबळ
जळगाव शहरातील कांचन नगरातील ज्ञानेश्वर उर्फ उत्तम पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (37) या तरुणाने चोरी केल्याचा संशय होता. या वादातून मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन भैय्या उर्फ आश्विन व त्याच्या सोबतच्या एकाने दुचाकीवरून घेवून गेले होते व आसोदा रोडवरील उद्यानात त्यास मारहाण करण्यात आली व तेथून पुन्हा पांढर्‍या रंगाच्या कारमधून आसोदा गावाजवळील पाटाजवळ नेत पुन्हा मारहाण करण्यात आली व या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचे कळताच आरोपींनी पळ काढला होता.



खून प्रकरणी पाच आरोपींना अटक
तरुणाच्या खुनाची माहिती कळताच लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शनिपेठ निरीक्षक रंगनाथ धारबडे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचार्‍यांसह ठसे तज्ञ, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. याप्रकरणी अनिता ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अश्विन उर्फ भैय्या साहेबराव शंखपाळ (32, आसोदा रोड, बगीचाजवळ, जळगाव), पवन चारूदत्त ठाकरे (29, आसोदा रोड, गजानन नगर, मोहन टॉकीजजवळ, जळगाव), जयवंत दत्तात्रय रायसिंगे (30, आसोदा रोड, वाल्मीक नगर, जळगाव), अजय सुरेश सोनवणे (31, आसोदा रोड, वाल्मीक नगर, जळगाव), वरुण दिलीप बाविस्कर (26, आसोदा रोड, वाल्मीक नगर, जळगाव) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !