नाना पटोले यांच्या वाहनाला अपघात : काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली ही मागणी


Accident to Nana Patole’s vehicle : Congress has made this demand to the Election Commission भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाला अपघात घडल्यानंतर राजकीय वर्तुळात यावरून आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अपघात प्रकरणी आता काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून चौकशीची मागणी केली आहे. कारचा झालेला अपघात हा फक्त अपघात होता की कट होता याची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

शंका-कुशंका व्यक्त
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील प्रचार दौर्‍यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून नाना पटोले यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे.पोलिसांनी सखोल तपास केला पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्या ड्रायव्हरची माहिती घेतली पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांनी नेत्यांना अधिक संरक्षण दिलं पाहिजे, नाना पटोलेंच आरोग्य चांगल रहाव अशी इच्छा व्यक्त करतो. ऐन निवडणुकीच्या काळात अपघात झाला त्यामुळे इथे संशय घ्यायला जागा आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !