चाळीसगावात ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक : धुळे, देवळाली, चाळीसगाव मेमूसह दहा रेल्वे गाड्या रद्द

रेल्वेकडून सणा-सुदीत रेल्वे प्रवाशांची गैरसोय : पाच गाड्यांचे मार्ग बदलले


Traffic and power block in Chalisgaon : Dhule, Deolali, Chalisgaon MEMU along with 10 trains cancelled भुसावळ : ऐन सणासुदीत रेल्वे प्रशासनाने चाळीसगाव स्थानकावर यार्ड रीमोल्डींग कामासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक मंगळवार, 16 एप्रिल रोजी जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे भुसावळ-देवळाली, धुळे-मुंबई, चाळीसगाव-धुळे, बडनेरा-नाशिक मेमूसह दहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या 14 ते 15 तर काही 15 ते 16 दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत या शिवाय अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काहींच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने ऐनवेळी जाहीर केलेल्या ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांना मात्र प्रचंड गैरसोंयीचा सामना करावा लागणार आहे.

16 रोजी आठ गाड्या उशिराने धावणार
16 रोजी ब्लॉक अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी सात ते दुपारी 12.30 पर्यंत घेण्यात येणार असल्याने दोन्ही मार्गावरील आठ गाड्या उशिराने धावतील. त्यात ट्रेन क्रमांक 12779 वास्को द गामा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस 1.30 तास उशिराने धावेल तसेच ट्रेन क्रमांक 22455 साई नगर शिर्डी- कालका एक्सप्रेस 15 मिनिटे उशिराने धावेल. ट्रेन क्रमांक 12336 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोड्डा एक्सप्रेस 20 मिनिटे तर ट्रेन क्रमांक 12534 मुंबई-लखनौ एक्सप्रेस15 मिनिटे उशिराने धावेल. ट्रेन क्रमांक 11078 जम्मू तवी-पुणे एक्स्प्रेस विभागात सव्वा चार तास उशिराने तर ट्रेन क्रमांक 12780 हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्सप्रेस विभागात 2.25 तासांपर्यंत उशिराने धावेल. ट्रेन क्रमांक 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 1.45 तासांसाठी तर ट्रेन क्रमांक 15946 दिब्रुगढ- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 1.40 तासांपर्यंत उशिराने धावणार आहे.



16 रोजी या गाड्यांच्या वेळेत बदल
ट्रेन क्रमांक 20103 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस 05.23 वाजता ऐवजी 08.23 वाजता सुटेल तर ट्रेन क्रमांक 12859 मुंबई-हावडा एक्सप्रेस सहा वाजेऐवजी 8.55 वाजता सुटेल तसेच ट्रेन क्रमांक 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस-अयोध्या कँट एक्सप्रेस सहा वाजेऐवजी 9.05 वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस 6.35 वाजेऐवजी 9.20 वाजता सुटणार आहे.

दहा रेल्वे गाड्या रद्द
ट्रेन क्रमांक 11113 देवळाली-भुसावळ मेमू 15 व 16 रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 11114 भुसावळ-देवळाली 14 व 15 रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 11120 भुसावळ -इगतपुरी मेमू 15 व 16 रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 11119 ईगतपुरी-भुसावळ मेमू 16 व 17 रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 11011 मुंबई-धुळे एक्सप्रेस मेमू 14 व 15 रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 11012 धुळे-मुंबई एक्सप्रेस मेमू 15 व 16 रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक मेमू 14 ते 16 दरम्यान रद्द, ट्रेन क्रमांक 01212 नाशिक-बडनेरा मेमू 14 ते 16 दरम्यान रद्द, ट्रेन क्रमांक 01304 धुळे -चाळीसगाव मेमू 16 रोजी रद्द, ट्रेन क्रमांक 01307 चाळीसगाव-धुळे मेमू 16 रोजी रद्द करण्यात आली आहे.

या गाड्यांचे मार्ग वळवले
ट्रेन क्रमांक 12168 बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 15 रोजी जळगाव, उधना, वसईरोड, दिवामार्गे वळवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 12880 भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 15 रोजी जळगाव, उधना, वसईरोड, दिवामार्गे वळवली जाईल. गाडी क्रमांक 12142 पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 15 रोजी जळगाव, उधना, वसईरोड, दिवा मार्गे वळवली जाईल तसेच ट्रेन क्रमांक 15065 गोरखपूर-पनवेल एक्सप्रेस 15 रोजी जळगाव, उधना, वसईरोड मार्गे वळवली जाईल व गाडी क्रमांक 11060 छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 15 रोजी जळगाव, उधना, वसईरोड, दिवा मार्गे वळवली जाणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !