बोदवड तालुक्यात 24 तासानंतर वीजपुरवठा : पंचनाम्यांचे आदेश
Power supply after 24 hours in Bodwad taluka : Order of Panchnamas बोदवड : बोदवड शहरासह तालुक्यात 9 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाली तसेच जागोजागी वीज पोल कोसळल्याने 24 तासांपासून वीजपुरवठा ठप्प झाला असून दुसर्या दिवशी रात्रीपर्यंतही तो सुरू करण्यासाठी वीज कंपनीच्या कर्मचार्यांना कसरत करावी लागली.
जिनिंगचे पत्रे उडाले : 24 तासानंतर वीजपुरवठा सुरळीत
बोदवड शहर व तालुक्यात 9 रोजी संध्याकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे शहरातील जय माता दि जिनिंग, खंडेलवाल जिनिंग व ओम जिनिंगमध्ये कापसासह सरकी ओली झाली तर जय माता दि जिनिंगचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. मुक्तळसह वराड येथे झाडे पडल्याने वाहतूक ठप् झाली होती तर हरणखेड येथे वीज कोसळल्याने प्रफुल्ल वराडे या शेतकर्याचा 20 क्विंटल कापूस जळाल्याचे सांगण्यात आले. बोदवड शहरातील वीज कंपनीचे खांब पडल्याने वीजपुरवठा ठप्प झाला. तहसीलदारांनी पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत. तहसीलदारांनी मनुर बु.॥ येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांच्या शेतात जावून नुकसानीची पाहणी केली.


