माजी खासदार उन्मेश पाटील मंत्री महाजनांवर बरसले : मग दहा वर्ष झोपा काढल्या का ?


Former MP Unmesh Patil lashed out at Minister Mahajan : Did you sleep for ten years? जळगाव : भाजपाने तिकीट कापल्यानंतर भाजपातून बाहेर पडलेले चाळीसगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजनांवर टिकेचे बाण चालवले आहेत. दहा वर्ष कॅबिनेट मंत्री असताना त्यावेळी तुम्ही झोपा काढल्या का? असा प्रश्न त्यांनी महाजनांचे नाव न घेता उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, व्यक्तीदोषाचे राजकारण कधीच केलेलं नाही जर तुम्ही चुकीचे काम करणार तर तुम्हालाही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी जळगावातील पत्रकार परिषदेत दिला.

मंत्री महाजनांवर सडकून केली टिका
ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तुम्ही झोपा काढत आहात का? कॅबिनेट मंत्री असताना पोखरा योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यातले एक गाव घेतलं नाही, लाज वाटत नाही का? एखाद्या माणसाने तोंड दाखवलं नसतं, असे म्हणत त्यांनी मंत्री गिरीश महाजनांवर सडकून टीका केली. तुम्ही चुकीचे काम करणार तर तुम्हालाही सोडणार नाही जामनेरबाहेरही निघू देणार नाही, असे म्हणत उन्मेश पाटलांनी गिरीश महाजनांना पत्रकार परिषदेतून थेट इशारा दिला.


विविध मुद्यांवर टाकला प्रकाश
केळी पीक विम्याबाबत अर्ज राज्यस्तरीय समितीने नाकारल्याने प्रलंबित असलेले 10 हजार 619 शेतकरी आणि अर्ज प्रलंबित ठेवण्यात आलेले 11 हजार 360 शेतकरी, यांच्या अर्जांची सद्यःस्थिती, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, पोखरा योजना अशा शेतकर्‍यांशी निगडित विविध मुद्यांवर भाष्य केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !