सराफाला पिस्टल लावत लूटले : तिघा आरोपींना अटक


कोल्हापूर : सराफाला पिस्टल व गुप्तीचा धाक दाखवून लुटणार्‍या तिघांना पोलिसांनी अट ककेली. मंगळवार पेठे येथील पुण्यपवित्र सोसायटीतील धर्मेद्र केसरीमल ओसवाल यांच्या फ्लॅटमध्ये घुसून लूटमार करण्यात आल्याचा प्रकार र बुधवार, 10 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. संशयितांनी रोख रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास केल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत आरोपींना अटक केली.

लुटीतील आरोपी खुनाच्या गुन्ह्यातील संशयीत
महादेव उर्फ हणमंत मसगोंडा कुलगुटगी (47, ा.पाचगाव, ता. करवीर), युनूस हसनसाब मुलतानी (28, रा.शिंदेनगर, निपाणी), धैर्यशील संभाजी सुतार (वय 25, रा.परिते, ता.करवीर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील महादेव हा 2013 साली पाचगाव येथे झालेल्या एका खुनाची संशयीत आरोपी असून सध्या तो पॅरोलवर बाहेर आहे.



चांदीचे व्यापारी धर्मेद्र केसरीमल ओसवाल हे मंगळवार पेठेतील पुण्यपवित्र सोसायटीत फ्लॅट नंबर 402 मध्ये राहतात. बुधवारी रात्री नऊ वाजता ते त्यांची पत्नी आणि दुकानातील कामगार घरात होते. यावेळी संशयीत महादेव कलगुटकी व त्याचे दोघे साथीदार हातात गावठी बनावटीचे पिस्तुल, गुप्ती घेऊन घरात घुसले. त्यांनी ओसवाल व त्यांच्या कामगाराला मारहाण केली.

त्यानंतर ओसवाल यांच्या अंगावर पिस्तुल रोखले, त्यांच्या पत्नील गुप्तीचा धाक दाखवत ओसवाल यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच देव्हार्‍यातील 20 ग्रॅम चांदीचे निरंजन असा चार हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !