भुसावळातील गणेश कॉलनीत भरदिवसा घरफोडी : 28 हजारांचा ऐवज लंपास
Broad daylight house burglary in Ganesh Colony in Bhusawal : 28 thousand in lieu of compensation भुसावळ : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम आहे. रामानंद हॉलमागील गणेश कॉलनीत चोरट्यांनी बंद घराला भर दिवसा टार्गेट करीत 28 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
विनीत कुमार अत्तर सिंह (37, प्लॅट क्रमांक दोन, श्रीहरि अपार्टमेंट, रामानंद हॉलमागे, गणेश कॉलनी) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 10 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4.40 दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. गोदरेज कपाटातील लॉकरमधून 25 हजारांची रोकड तसेच तीन हजार पाचशे रुपये किंमतीचे ईअरबर्ड असा एकूण 28 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज लांबवला.


सायंकाळी सिंह घरी आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विनोद सपकाळे करीत आहेत.