राष्ट्रीय बाल व किशोर विकास समितीच्या सहप्रभारीपदी संगीता बियाणी
भुसावळ : राष्ट्रीय बाल व किशोर विकास समितीच्या राष्ट्रीय सहप्रभारीपदी संगीता मनोज बियाणी यांची नियुक्ती करण्यात आली. बियाणी यांची नियुक्ती झाल्याने राष्ट्रीय माहेश्वरी महिला संघटनाच्या कल्पना गगरानी, पुष्पा तोषनीवाल, शैला कलंत्री, लता लाहोटी, शांती मुंदडा, अनुसूया मालू, सुनिता पलोड, ज्योत्स्ना लाहोटी, सुनिता चरखा, राधा झंवर आदींनी अभिनंदन केले आहे.
