भुसावळ पालिकेची 28 रोजी अर्थसंकल्पीय सभा


करवाढ नसल्याने दिलासा मिळण्याची शक्यता : सर्वसाधारण सभेलाही 4 मार्चचा मुहूर्त

भुसावळ : भुसावळ नगरपालिकेची अर्थसंकल्पीय सभा 28 फेब्रुवारी रोजी होत आहे तर सर्वसाधारण सभा 4 मार्चला सकाळी 11 वाजता होत आहे. या अर्थसंकल्पीय सभेत विरोधक काय भुमिका घेतात? याकडेही लक्ष लागून आहे. या सभेचे अजेंडा नगरसेवकांना देण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून रखडलेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेलाही मोठ्या प्रतीक्षेनंतर मुहूर्त गवसला आहे. पालिकेची सभेसमोर 53 विषय ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरातील कोणत्याही प्रभागाचा स्वतंत्र विषय नसून शहराच्या विकासाच्या निगडीत विषय घेण्यात आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली सभा तब्बल साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर होणार आहे. पालिका प्रशासनाने गेल्या अर्थसंकल्पात वाढीव करवाढ केली नव्हती, या अर्थसंकल्पातही कोणतीही करवाढ नसलेला व शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सत्ताधारी भाजपचे प्रयत्न राहणार आहेत. या सभेत विरोधातील जनआधार विकास पार्टीतर्फे काय भूमिका घेतली जाते? अर्थसंकल्पाबाबत विरोधी नगरसेवक काय भुमिका मांडणार? सभेत चर्चा होणार काय? याबाबतही शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !