डाऊन गोरखपूरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह


भुसावळ : डाऊन 12542 एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस- 4 ते एस- 5 दरम्यानच्या शौचालयाजवळ 30 ते 32 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना 25 रोजी घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उंची पाच फूट, ाक सरळ, रंग गोरा, शरीर बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे, चेहरा लांबट, अंगात हिरव्या रंगाची साडी तसेच लाल रंगाचे ब्लाऊज, पांढर्‍या रंगाचे अंगात स्वेटर तसेच गळ्यावर जुन्या जखमेचे व्रण असे अनोळखी महिलेचे वर्णन आहे. अनोळखीच्या मृत्यूचे अद्याप ठोस कारण कळू शकलेले नाही. ओळख पटत असल्यास लोहमार्गचे हवालदार रामकृष्ण खंडागळे (9823010463) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !