सेल्फि स्टेटसला ठेवत भुसावळातील तरुणाची आत्महत्या
भुसावळ : शहरातील गंगाराम प्लॉट भागातील 32 वर्षीय तरुणाने गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. पंकज सुरेश सोनवणे (32, गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हातमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करणार्या पंकज सोनवणे यांनी आत्महत्या का केली? याचे अद्याप कारण कळू शकले नाही. याबाबतची माहिती बाजारपेठ पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी धाव घेत पंचनामा केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनीदेखील धाव घेतली. मृताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी व भाऊ असा परीवार आहे.
