भुसावळातील पहेलवान आशिक बागवान यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार


भुसावळ : कुस्त्यांचा आखाडा गाजवणार्‍या आशिक बागवान यांच्यासाठी त्यांनीच आयोजित केलेली दंगल बुधवारी सायंकाळी अखेरची ठरली होती. कुस्त्यांचे सामने रंगात आले असतानाच बागवान यांना हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवल्याची घटना खडका रोडवरील नवीन ईदगाह मैदानावर ‘खान्देश का महामुकाबला’ या कुस्त्यांच्या दंगलीत घडली होती. गुरुवारी दुपारी तीन वाजता उर्दू शाळा क्रमांक तीनमध्ये नमाज पठण केल्यावर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक व राज्या-परराज्यातील हजारो मुस्लीम व बागवान समाजबांधवांच्या उपस्थितीत मुस्लीम कब्रस्तानमध्ये दफनविधी (अंत्यसंस्कार) करण्यात आले.

हृदयविकाराने झाला होता मृत्यू
शहरातील इक्बाल पहिलवान आखाड्यातर्फे बुधवारी खान्देश का महामुकाबला या कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात आले असता या सामन्यांसाठी राज्यासह देशभरातून नामांकित मल्ल आले होते. मुख्य आयोजक नगरसेवक इक्बाल सरदार बागवान यांचे लहान बंधू तथा केळीचे व्यापारी व आयोजक आशिक सरदार बागवान हे कुस्त्यांच्या आखाड्यातच नियोजन पाहत होते. मुख्य चार कुस्त्यांच्या लढतीमधील चौथ्या क्रमांकाची लढत सुरू झाल्यानंतर त्यांना आखाड्यात अस्वस्थ वाटू लागले. भोवळ येत असल्याने ते आखाड्याबाहेर येवून जमिनीवर बसले. आयोजकासह बागवान परीवारातील सदस्य पोलिस नाईक रमेश चौधरी, युवराज अंबोले व त्यांच्या बंधूसह उपस्थितांनी डॉ.राजेश मानवतकर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉ.राजेश मानवतकर यांनी ईसीजी, प्रथमोचार केले मात्र तीव्र हदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला मात्र यानंतर पुन्हा प्रयत्न म्हणून बागवान परीरवारासह सचिन चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, रमेश चौधरी, युवा अंबोले आदींनी त्यांना उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात दाखल केले मात्र गोदावरी रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत आशिक बागवान यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, चार भाऊ, तीन बहिणी, वडील असा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !