खासदार रक्षा खडसे यांचा चोपडा तालुक्यात प्रचाराचा झंझावात

मोदीजींदा तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदानाचे आवाहन


चोपडा : रावेर लोकसभेच्या महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी शनिवारी चोपडा तालुक्यातील धानोरा, अडावद, मंगरूळ, खेडीभोकरी, गोरगावले बु.,॥ गोरगावले खु.॥ व खडगाव भागात प्रचार दौरा केला. यावेळी ग्रामस्थांच्या त्यांनी भेटी-गाठी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले.

मतदारांचे घेतले आशीर्वाद
सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे आदी मित्र पक्षातील पदाधिकारी यांच्यासह चोपडा तालुक्यातील मौजे धानोरा, अडावद, मंगरूळ, खेडीभोकरी, गोरगावले बु.,॥ गोरगावले खु.॥, खडगाव आदी गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !