बँकेत केवायसीसाठी गेलेली जळगावातील विवाहिता बेपत्ता


जळगाव : केवायसी करण्यासाठी शिवकॉलनी येथील बँकेत जाण्यासाठी निघालेली विवाहिता सोमवार, 22 रोजी दुपारी एक वाजता बेपत्ता झाली. आरती दिनेश भोळे (29, रा.तळेले कॉलनी, जुनाखेडी रोड,जळगाव ) असे हरविलेल्या विवाहितेचे नाव आहे.

कुटुंबियांना सर्वत्र शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !