नाशिकचा तिढा अखेर सुटला : शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी


नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेसाठी सुरू असलेला लढा अखेर सुटला आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, उद्या गुरुवारी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे हे शक्तिप्रदर्शन द्वारे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येणार !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महायुतीचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऐवजी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेच या मिरवणुकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.


नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे सेना भाजप आणि राष्ट्रवादीने दावा सांगितला होता त्यामुळे उमेदवारी विलंब होत होता मात्र हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित झाल्यामुळे त्यांनी आता अन्य पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गोडसे तातडीने भाजपा कार्यालयात रवाना झाले तर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !