राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवारांची मुक्ताईनगरासह चोपड्यात 3 मे रोजी जाहीर सभा
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ सभा ः भुसावळात होणार महाविकास आघाडीची बैठक
रावेर : राष्ट्रवादीचे सुप्रीमो तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शुक्रवार, 3 रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ या दिवशी चोपडा व मुक्ताईनगर शहरात जाहीर सभा होणार आहे. या सभेत शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, भुसावळात शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे.
चोपड्यात मेळावा
रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवार, 3 रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा येथे सकाळी साडे दहा वाजता जाहीर सभा होत आहे. त्यानंतर दुपारी सव्वा चार वाजता भुसावळ येथील संतोषी माता हॉलमध्ये महाविकास आघडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा होईल.

याचदिवशी संध्याकाळी सात वाजता मुक्ताईनगर येथील कोथळी रोडवरील मुक्ताई क्रीडा संकुलात शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी अधिकाधिक संख्येने चोपडा, भुसावळ व मुक्ताईनगर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




