भोपाळात केली चोरी मात्र भुसावळ पडल्या बेड्या
भुसावळ : भोपाळात रेल्वेतून चोरी करून पसार झालेल्या नेपानगरसह भुसावळातील आरोपीच्या मुसक्या भुसावळ शहर पोलिसांनी कोम्बिंगदरम्यान आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून लेडीज पर्स, फायटर, दोन हजार शंभर रुपये रोख, 10 इंच लांबीचा व स्टीलची मूठ असलेला चाकू तसेच दोन सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या. राजकुमार कडू दवडे (23, रेल्वे स्टेशनजवळ, नेपानगर) व समीर शाह जब्बार शहा (18, दिनदयाळ नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकारी शुक्रवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवत असताना रेल्वे हॉस्पीटलच्या कडेला संशयीत झाडाच्या आडोशाला बसले असताना त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर झडतीदरम्यान त्यांच्याकडे वरील साहित्य सापडले मात्र त्यांनी त्याबाबत समाधानकारक खुलासा न त्यांना अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत त्यांनी भोपाळात चोरी केल्याची कबुली दिली.
