भुसावळात उत्सव समितीच्या अध्यक्षपदावरून एकावर चाकूहल्ला


भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदासह पूर्व वैमनस्याच्या कारणावरून शहरातील किरण अशोक आराक (32, रा.अशोक नगर) यांच्यावर सात जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना शनिवार, 28 रोजी दुपारी तीन वाजता अशोक नगरात घडली. या हल्ल्यात खरात हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी खरात यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सात जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा
आराक यांच्या तक्रारीनुसार हे शुक्रवारी दुपारी घराजवळ असताना संशयीत आरोपी सुभाष उर्फ विठ्ठल श्रीराम मोरे, ऋषिकेश सुभाष मोरे, संदीप भीमराव खंडारे, धीरज वसंत खंडारे, विजय शेषराव भालेराव अजय विजय भालेराव, गोल्या उर्फ अक्षय भीमराव खंडारे यांनी पूर्व वैमनस्यातून चाकूने हल्ला केला. त्यात किरण आराक हे गंभीर जखमी झाले. या संदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरनं. 69/20, भादंवि कलम 307 143, 148, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !