एरंडोलला कौटूंबिक वादातून मुलाकडून आईची दगडावर डोके आपटून हत्या

दाम्पत्याला एरंडोल पोलिसांनी ठोकल्या बेड्या : घटनेने समाजमन हळहळले


Mother killed by son by hitting his head on a stone due to family dispute in Erandol एरंडोल : प्लॉट विक्रीसह व कौटुंबिक वादातून मुलासह त्याच्या पत्नीने वृद्धेची डोके दगडावर आपटून हत्या केली. ही संतापजनक घटना एरंडोल तालुक्यातील केवडीपुरा भागात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. विमलबाई रोहिदास मोहिते (60, बेलदार) असे मयत वृद्धेचे नाव आहे. या प्रकरणी दाम्पत्याला अटक करण्यात आली.

डोके दगडावर आपटून केला निर्घृण खून !
एरंडोल शहरातील केवडीपुरा भागात विमलबाई मोहिते या वास्तव्याला होत्या. त्यांच्या घराशेजारी असलेली जागा विमलबाई यांच्या नावावर होती. ती जागा विकण्यासाठी विमलबाई यांचा मुलगा बापू मोहिते व त्याची पत्नी शिवराबाई मोहिते हे वृद्धेला त्रास देत होते तसेच त्यांच्याकडून वृद्ध महिलेला मारहाण देखील होत असल्याने वृद्धा विमलबाई या काही दिवस धरणगावात आपल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र समाजातील काही प्रतिष्ठीत लोकांनी विमलबाई यांच्या मुलासह त्याच्या पत्नीची समजूत काढल्यानंतर त्या पुन्हा मुलाकडे राहण्यास आल्या होत्या.

रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दाम्पत्याने वृद्ध विमलबाई यांचे डोके दगडावर आपटून त्यांचा निर्घृण खून केला. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात वसंत उमराव मोहिते यांच्या फिर्यादीवरून आरोपी दाम्पत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !