लोकसभा निवडणूक : जळगावसाठी 57.70 टक्के तर रावेरात 63.01 टक्के मतदान
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा दरम्यान मतदान झाले. प्रशासनाच्या माहितीनुसार जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 57.70 टक्के तर रावेर मतदारसंघात सरासरी 63.01 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय मतदान असे-


- जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ-52.90 %
- जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- 62.60 %
- अमळनेर विधानसभा मतदारसंघ- 55.94 %
- एरंडोल विधानसभा मतदारसंघ- 61.76 %
- चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ- 55.01 %
- पाचोरा विधानसभा मतदारसंघ- 59.82 %
रावेर लोकसभा मतदारसंघनिहाय मतदान असे-
- चोपडा विधानसभा मतदारसंघ- 61.52 %
- रावेर विधानसभा मतदारसंघ- 67.77 %
- भुसावळ विधानसभा मतदारसंघ- 57.33 %
- जामनेर विधानसभा मतदारसंघ- 60.18 %
- मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ- 64.56 %
- मलकापुर विधानसभा मतदारसंघ- 67.36 %