जामनेर तालुक्यात दारूवरून वाद : पूत्राकडून पित्याची हत्या


Father killed son in Jamner taluka : Argument escalated due to drinking alcohol जामनेर : दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून पिता-पुत्रांमध्ये वाद झालनंतर पुत्राने संतापात पित्याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घूण केला. ही धक्कादायक घटना गुरुवार, 16 मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. बाजीराव राजाराम पवार (55, रा.पळासखेडा बु.॥, ता.जामनेर) असे मयत पित्याचे तर सुमित बाजीराव पवार (32) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

दारूचा वाद बेतला पित्याच्या जीवावर
बाजीराव पवार हे गावात पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, नातवंडे यांच्यासह वास्तव्याला होते. वाहन चालक म्हणून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवार, 16 मे रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घरामध्ये बाजीराव पवार आणि त्यांचा मुलगा सुमित बाजीराव पवार (32) यांचा दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन मुलाने धारदार शस्त्राने पित्यावर सपासप वार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ग्रामस्थांच्या मदतीने आणण्यात आला. तेव्हा मारेकरी मुलगा देखील सोबत होता. घटना ऐकून त्यावेळी डॉक्टरांसह कर्मचारी देखील चक्रावून गेले. त्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली.

पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयात येऊन संशयित आरोपी सुमित पवार याला ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान या थरारक घटनेमुळे पळासखेडा बु.॥ गावामध्ये खळबळ उडाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !