रावेरात पेट्रोल पंपावर शॉक लागल्याने परप्रांतीय युवकाचा मृत्यू


रावेर : रावेर शहरातील श्रीराम पेट्रोल पंपावर स्टिलच्या आरओ मशीनवर थंड पाणी पिण्यासाठी गेलेल्या परप्रांतीय 28 वर्षीय युवकाचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. ध्रुवकुमार चरणसिंग कुशवा (26, सुजावलपूरा, ता.लहार, जि.भिंड, मध्यप्रदेश, ह.मु.श्रीकृष्ण नगर, सावदा रोड, रावेर) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शॉक लागताच तरुणाचा मृत्यू
रावेर शहरातील श्रीराम पेट्रोलियमसमोर पाणीपुरीची गाडी लावून ध्रुवकुमार चरणसिंग कुशवा हा युवक अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत होता. रविवारी सायंकाळी श्रीराम पेट्रोलियम येथे थंड पाण्याच्या आर.ओ.मशीनवर तो पाणी पिण्यासाठी गेला असता मशीनमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा जोरदार धक्का त्याला बसताच तो खाली कोसळला. स्थानिक नागरिकांनी धु्रवकुमार यास रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.विरेंद्र काटकर यांनी तपासून मृत घोषीत कले. मयत तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून त्याच्या पश्चात आई-वडील व गर्भवती पत्नी असा परिवार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !