किरकोळ कारणावरून कोळवदला 52 वर्षीय इसमाला तिघांची मारहाण
52-year-old Isma was beaten up by three people in Kolwad for a minor reason यावल : यावल तालुक्यातील कोळवद येथे 52 वर्षीय इसमाने एकाला सांगितले की, लघूशंका येथे करू नको, पुढे जा. या बोलल्याच्या रागातून 52 वर्षीय इसमाला तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ वादातून मारहाण
कोळवद, ता.यावल येथे भास्कर आत्माराम पाटील (52) हे आपल्या घरासमोर उभे असताना घरापुढेच रवींद्र दिलीप कोळी हा लघू शंकेसाठी थांबला. भास्कर पाटील यांनी सांगितले की, इथे लघूशंका करू नको, पुढे जा. तेव्हा या बोलण्याच्या रागातून रवींद्र दिलीप कोळी, फारूक राजू तडवी, विश्वकर्मा सिद्धार्थ भालेराव या तिघांनी त्यांना शिविगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.
