वढोदा वनक्षेत्रात पट्टेदार वाघाचे दर्शन


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनविभागाच्या परिक्षेत्रातील मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्रात एकूण 14 हजार 500 किमीचा वनविभाग विस्तार आहे. यात वनविभागाने आपल्या परिक्षेत्रातील विविध ठिकाणी उन्हाची तीव्रता व पाण्याची कमतरता लक्षात घेता वन्यप्राण्यांना आपली तहान भागविण्यासाठी पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यातून बाहेर पडताना शुक्रवार, 17 मे रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास ट्रॅप कॅमेर्‍यात पट्टेदार वाघ कैद झाला आहे.

पुन्हा वनविभागाच्या हद्दीत वाघाचे अस्तित्व असल्याचे दिसून आले आहे. वनविभागाच्या माहितीनुसार ही पट्टेदार मादी असून आणखी या राखीव क्षेत्रात पाच वाघ आहेत. त्यात दोन मादी, एक नर व दोन बछडे असल्याचे सांगण्यात आले. वढोदा वनविभाग वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे मुक्ताई भवानी राखीव संवर्धन कुठेही वन्यप्राण्यांचे अस्तित्व दिसल्यास वढोदा वनविभाग कार्यालयात तत्काळ माहिती द्यावी अथवा 1126 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !