गोजोरा शिवारातून चोरट्यांनी 20 हजारांचे बोकड लांबवले : चोरट्याविरोधात गुन्हा


भुसावळ : भुसावळ तालुक्यातील गोजोरा शिवारातून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीचे दोन बोकड लांबवले. चोरीचा प्रकार मंगळवार, 14 रोजी सकाळी सात ते दहा दरम्यान घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोजोरा शिवारातील घटना
सुरेश भिका सुरवाडे (गोजोरा, ता.भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी गोजोरा शिवारात पाळीव प्राण्यांना चराईसाठी गोजोरा शिवारात नेल्यानंतर चोरट्यांनी सकाळी सात ते दहा दरम्यान प्रत्येकी दहा हजार रुपये किंमतीचे दोन बोकड चोरी करून नेले. याप्रकरणी रविवारी अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !